जीवनातील रंगाचे महत्त्व व उपयुक्तता [ Important Color in Life ]

                                                जीवनातील रंगाचे महत्त्व
 विधात्याचे या सृष्टीवर प्रेम आहे आणि म्हणूनच आपल्या जगात त्याने कितीतरी रंग उत्पन्न केले आहेत .
तीन मुख्य रंग निळा , तांबडा , पिवळा हे रंग एकमेकांत मिसळून नारंगी , जांभळा , हिरवा असे रंग बनविता येतात . परंतु या रंगांपासून असंख्य विविध रंगांची निर्मिती होऊ शकते . म्हणूनच हे विविध रंगीबेरंगी जग आपल्याला मोहित करत असते .

important of color in our life ,color in life
lot of color 
आपल्याला दिसू शकतील असे २. ५ लक्ष रंग आहेत , असे शास्रज्ञ म्हणतात . या प्रत्येक रंगाची विदयुत -लहरी -लांबी [ Electromagnetic Wavelength ] दुसऱ्या सर्व रंगाहुन निराळी असते .
रंग आणि रंगाबद्दल मानवामध्ये आकर्षण ,आवड ही आदिमानवापासून आहे . जीवनामध्ये रंगाला फारच महत्त्व आहे . रंग नसते तर.........? असे चित्र नुसते डोळ्यासमोर आणून पाहा , काय वाटते ते .

important color in life,important of color in our life
हळदी कुंकू 
भारतीय संस्कृतीत ही रंगला फार महत्व आहे . आपल्याकडे हळद -कुंकू [ पिवळा - तांबडा ] आंब्याची पाने [ हिरवा ] सौभाग्य ,मांगल्य अशा दृष्टीने त्यांना महत्त्व आहे . मंगलकार्य असेल की आपल्याकडे ज्या विविध गोष्टी ,कार्य असतात त्यात सर्व रंग येतात . तसेच पांढरी रंगोळी काढू नये असा आपल्याकडे एक नियम,संकेत आहे . पांढरी रंगोळी काढणे अशुभ मानतात .मग त्यावर हळदी - कुंकू अथवा रंग टाकतात . विविध रंगानी रंगोळी भारतात . ती आकर्षक दिसावी ,तिने मोहित करावे ,तिने मंगल प्रसंग आहे हे सूचित करावे यासाठीच मंगलकार्यात लोकांना कपाळावर कुंकूम - तिलक लावतात . या सर्वातून एक आनंदी - मंगल वातावरण निर्माण होते . रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात कचरा साठत असतो . लोक त्या कोपऱ्यात अधिक कचरा टाकत असतात .परंतु एका रात्रीत तेथे स्वच्छ करून ,शेणाने सारवून एक दगड ठेवला व त्याला शेंदूर फासला तर त्या ठिकाणचे वातावरण बदलते . तेथे कोणी कचरा टाकत नाही . रंगाने दगडालाही देवपण प्राप्त होते . आपल्या अवतीभवतीचे वातावरण किती रंगीबेरंगी आहे . निसर्गात किती रंग आहेत, विविधता आहे ! हे जगच विविध आकार , रंगछटांनी नटलेली आहे .
म्हणूनच लहानांपासून थोरांपर्यंत या जगाबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे . लहान मुलांना पेन्सिलने चित्र काढणे आवडत नाही . त्यांना रंग दिले ,तर ते अधिक तन्मयतेने चित्र रेखाटतात. रंगात रममाण होऊन जातात. रंगांमुळे लक्ष हे खेचले जाते . रस्त्यावरून जाताना एखादी रंगीत जाहिरात आपले लक्ष खेचून घेते किंवा गर्दीतील एखाद्या लाल वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीकडे लक्ष जाते. हिरव्यागार हिरवळीवरील , झाडाझुडपातील लाल कौलारू घर उठून दिसते . असे का होते .... ? याला हे रंग कारणीभूत आहे. 
सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या क्रिया रोज होतात . तरी रोज आकाशामध्ये वेगवेगळ्या वेळी विविध रंग पसरलेले दिसतात . विविधतेने नटलेले आकाशाचे नयनरम्य दर्शन घडते . त्याचबरोबर रंग व त्याच्या विविध छटाही दृष्टीस पडतात . झाडाचा हिरवा रंग हा एकसारखा नाही , तर त्यात विविध छटा विविध हिरवे रंग भरलेले आहेत .
important color in life,important of color in our life
child love red flower 
बागेत ' फुले तोडू नये ' अशी पाटी असते .लहान मुले - मुली बागेत गेल्यावर हळूच फुले तोडतात . ह्यामागे मानसशास्त्र आहे . फुलांचे रंग मुलांना आकर्षित करतात . '' रंग सौंदर्य निर्माण करतात .''
 घरातील फर्निचर .घराच्या भिंती नानाविध रंगांनी नटलेल्या असतात . सनमायका , फोरमायका ,चकाकणारे रंग , धुता येणारे रंग हे घराची शोभा वाढवितात . सौंदर्य निर्माण करतात.
'' हे रंग नसते तर जग नीरस ,निरुत्साही , दुःखी ,उदास  वाटले असते . 
म्हणूनच विधात्याने मानवी जीवन सुखी , आनंदी , सौंदर्यपूर्ण करण्यासाठी ,मानवी मनाला चेतना , उत्साह , प्रेरणा  देण्यासाठी हे विविध रंग निर्माण केले आहेत . 
या रंगांची निर्मिती ही मानवाला मिळालेले महान ' वरदान ' आहे . मानवाला आपल्या जीवनात पदोपदी त्याचा उपयोग होतो .  ''  
एक रंग हा दुसऱ्या रंगाहुन भिन्न असतो . प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते . प्रत्येक रंग आपल्या रंगवैशिट्यांमुळे विशिष्ट परिणाम साधतो . प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे . रंगाचे अस्तित्व व त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते . रंगांमुळे आपल्याला वस्तू शोधने सोपे जाते . फळभाज्यांच्या रंगावरून त्याचा ताजेपणा आपणाला कळतो . कच्ची व पक्की फळे सहज ओळखता येतात . नख , जीभ , डोळे  यांच्या रंगांवरून डॉक्टर आजाराविषयी निदान करतात .
जीवनातील रंगांचे महत्त्व व उपयुक्तता शब्दात मांडणे अशक्यच आहे . कारण मन आणि रंग यांचे नातंच काही निराळे आहे आणि म्हणूनच रंगांनी मानवाला नुसते आकर्षित केले नाही ,तर त्याच्या सामाजिक व संस्कृतीत जीवनामध्ये ह्या रंगांनी ''रंग ''भरले . यामुळे रंगाला  मानवी जीवनात मह्त्वाचे असे प्रमुख स्थान आहे ......
         
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी. बरेच ...

Blogger द्वारे प्रायोजित.