रंग ज्ञान कसे होते ?/ what is color sense ?

रंग  रंगज्ञान 

colour sense,colour sense meaning
colour sense 

रंग ज्ञान कसे होते ?/ what is color sense ?


रंगज्ञान - 
रंगज्ञान होण्याकरिता प्रकाश, डोळा मेंदू यांची आवश्यकता असते.निसर्गातील सर्व रंग ,विविध रंगीत फुले ,पाने, पक्षी ,प्राणी ,फुलपाखरे सूर्योदय सूर्यास्त यावेळेस मनोहारी रंग यांचे ज्ञान आपणास प्रकाशामुळे होते. प्रकाश नसेल तर कोणत्याही रंगाचे ज्ञान आपणास होणार नाही. हे ज्ञान होण्यासाठी प्रकाशाबरोबर डोळा मेंदू यांची आवश्यकता असते.

प्रकाश -
प्रकाशा विषयी निश्चित अशी व्याख्या नाही परंतु अनेक शास्त्रज्ञांनी काही नियम मात्र शोधून काढले.नैसर्गिक प्रकाशाचे एकमेव उगमस्थान सूर्य हा असून काही वेळा प्रकाश वातावरणातील धुलिकणांमुळे दिसू शकतो. जीवनामध्ये प्रकाशाला सर्वोच्च स्थान असून प्रकाशामुळे आपणास रंगज्ञान होते. वस्तूच्या विशिष्ट गुणधर्मानुसार प्रकाशातील काही रंग किरणे ती वस्तू शोषून घेऊन उरलेली रंग किरणे परावर्तित करते.ती आपल्या डोळ्यांमध्ये शिरतात आपणास त्या वस्तूच्या रंग रूपाचे ज्ञान होते.

प्रकाशाचे नियम :
1)
प्रकाश किरणे सरळ रेषेत जातात.
2)
प्रकाश किरणांचे वक्रीभवन होऊ शकते.
3)
प्रकाश किरणांचे परावर्तन होऊ शकते.
4)
प्रकाश किरणांचे पृथक्करण होऊ शकते.
colour sense,colour sense meaning
colourfull 
 
डोळा:
डोळ्याच्या विशिष्ट रचनेमुळे आपणास रंगाची संवेदना होते. डोळ्याच्या अंतर रचने नेत्रपटलाच्या मध्यावर सभोवती सुमारे 13 कोटी 70 लक्ष अशा असंख्य अतिसूक्ष्म रंग संवेदना देणाऱ्या या पेशी असतात, या पेशी दोन प्रकारच्या असतात.
1)
दंडगोल  2) शंकु


1) दंडगोल:
या काड्यांच्या आकाराच्या पेशी असतात, म्हणून यास दंडगोल असे म्हणतात. या पेशी मुळे छाया प्रकाशाचे ज्ञान होते. या पेशी अशक्त किंवा निष्क्रिय झाल्यास रातांधळेपणा [Night-Blindness ] येण्याची शक्यता असते.

2) शंकु:
या शंकूच्या आकाराच्या पेशी असून यांचे गुन्हा 'अ' आणि 'ब' असे दोन भाग पडतात.  'अ' प्रकारच्या पेशी मुळे पिवळ्या निळ्या रंगाच्या संवेदना होतात.तर ''ब'' रंगाच्या पेशींमुळे तांबड्या हिरव्या रंगाचे ज्ञान होते.या दोन्ही पेशींची संख्या जर कमी जास्त झाली किंवा या पेशी अकार्यक्षम झाल्या तर रंग अंधत्व [ Colour Bilndness ] येण्याची शक्यता असते.

colour sense,colour sense meaning
colour sense 

मन:

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून रंगांचा विचार करताना मनाचा मनावर होणारा मानसिक परिणाम हा महत्त्वाचा ठरतो. रंग चैतन्यमय आहेत. रंगाचा दर्शनामुळे मानवी मनामध्ये आनंद, चैतन्य, वैराग्य, शांतता, स्थिरता, अस्थिरता, राग इत्यादी विविध भावनांच्या लहरी निर्माण होतात. त्यांच्या मानसिक   दृकसंवेदनामुळे मानवी भावस्थिती बदलते बदलणाऱ्या भावस्थितीमुळे रंगांना प्रतीकात्मक सांकेतिक अर्थ प्राप्त होतोअसा रंगांचा मानवी भावस्थितीचा अन्योन्य संबंध आहे. म्हणूनच रंग ज्ञानात मनाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक रंगाचा मानसिक परिणाम हा सापेक्ष असून तो प्रत्येकाच्या मानसिक स्थितीप्रमाणे वेगवेगळा असू शकतो.

colour sense,colour sense meaning
Color 
  
रंग ज्ञान कसे होते ? :
वस्तूचा पृष्ठभागावरील रचनेमुळे प्रकाशकिरणांतील काही रंगकिरणांच्या लहरी तो पृष्ठभागावर परावर्तीत करतो, हे परावर्तित किरण आपल्या डोळ्यातील बुबुळात असणाऱ्या बाहुलीतून ( lris ) आत शिरतात. या बुबुळतील (नेत्रमनी किंवा लेन्स ) बहिर्गोल भिंग असते. त्यातून पाहिजे तेवढेच प्रकाशकिरण आत जाऊन वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर ( Retina) पडते.
या नेत्रपटलावर प्रकाशकिरणांनी प्रभावित होणाऱ्या कांड्या  शंकूच्या आकाराच्या पेशी उद्दीपित होतात.यांचा संबंध तंतूंशी [Optical Nerves ] असल्यामुळे वस्तूंचे रंगज्ञान अती तीव्रतेने आपल्या मेंदूला होते.

सूर्यापासून येणारा प्रकाश हा अदृश्य असतो. धूलिकणांमळे तो दृश्य होतो. या प्रकाशलहरी एका सेकंदाला सुमारे 1,86, 000 हजार मैल प्रवाह करतात. एवढा प्रचंड वेग असतो.वर पाहिल्याप्रमाणे वस्तूवर पडलेल्या प्रकाशाच्या हा परावर्तित होणाऱ्या भिन्न भिन्न लांबीच्या लाटा डोळ्यात शिरतात त्यामुळे मेंदूला जी रंग संवेदना होते ती म्हणजेच रंग. या भिन्न भिन्न लाटांमुळे रंग दिसतात.


३ टिप्पण्या:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी. बरेच ...

Blogger द्वारे प्रायोजित.