रंग आणि रंगसंगती कसे तयार होतात ? [Colour and Color Scheme in Marathi ]

रंग आणि रंगसंगती कसे तयार होतात ?   [Colour and Color Scheme in Marathi ]

निसर्गातील सौंदर्य हे रंगांमुळेच द्विगुणित झाले आहे . रंग हे पाहणाऱ्याच्या मनावर परिणाम करतात . निसर्गाचे सौंदर्य हे मनाला मोहित करणारे असते . डोंगर ,निळे आकाश ,डोलणारी पिके ,दूरवर दिसणारी रंगीबेरंगी पाने फुले ,फुलपाखरे ,पशु -पक्षी  हे सारे पाहून डोळे सुखावतात. कुठलाही रंग चांगला अथवा वाईट नसतो . एखाद्या चित्रात ती रंग सुसंगत आहे का विसंगत यावर त्याचे चांगले वाईटपण ठरते ,म्हणूनच चित्रात रंगसंगती महत्वाची ठरते . निसर्गात विविध रंगांची मुक्त उधळण झालेली आहे . निसर्गातील हि रंगसंगती पाहूनच सौंदर्यवाढीसाठी रंगांचा वापर सुरु झाला . कलाकृती सुंदर होण्यासाठी रंगाचे मूलभूत तत्त्व समजून घेणे आवश्यक आहे .
रंग आणि रंगसंगती कसे तयार होतात ?   [Colour and Color Scheme in Marathi ]

रंग :

१. मूळ रंग : लाल ,पिवळा व निळा हे आहेत . या तीन रंगांच्या मिश्रणातून करडा रंग तयार होतो .
२. दुय्यम रंग : दोन मूळ रंगांच्या मिश्रणाने दुय्य्म रंग तयार होतात .नारंगी , जांभळा व हिरवा हे दुय्य्म रंग आहे.
पिवळा + लाल = नारंगी [Orange ]
लाल + निळा = जांभळा [ Violet ]
निळा + पिवळा = हिरवा [ Green ]
रंग आणि रंगसंगती कसे तयार होतात ?   [Colour and Color Scheme in Marathi ]

३. तृतीय श्रेणीचे रंग
: कोणत्याही दोन दुय्य्म रंगांचे साधारणतः समप्रमाणात मिश्रण केले असता , तुतीय श्रेणीचे रंग मिळतात . तृतीय श्रेणीचे रंग तयार करताना जे मूळ रंग अधिक प्रमाणात येतात , त्या रंगांची छटा मिश्र रंगात दिसून येते .
हिरवा + नारंगी = पिवळसर करडा [Olive ]
जांभळा + हिरवा = निळसर करडा [ Slate ]
नारंगी + जांभळा = तांबूस करडा [ Russet ]
४. विरोधी रंग : विरोधी रंग ओळखण्यासाठी व लक्षात ठेवण्यासाठी तीन मुळ रंग घ्या .
लाल रंगाचा विरोधी रंग मिळण्यासाठी राहिलेले दोन रंग -पिवळा ,निळा एकमेकांत मिसळा . या मिश्रणाने तुम्हाला हिरवा रंग मिळेल . म्हणजे लाल रंगाचा विरोधी रंग हिरवा . अशा प्रकारे विरोधी रंगांच्या तीन जोड्या पडतात . १. लाल विरोधी रंग हिरवा ,२. पिवळा विरोधी रंग  जांभळा , ३. निळा विरोधी रंग नारंगी .
५. मित्र रंग : दुय्य्म रंग ज्या मूळ रंगांच्या घटकांनी बनलेला असतो , ते मूळ रंग व तो दुय्य्म रंग यांना परस्परांचे '' मित्र रंग '' म्हणतात . निळ्या रंगांचे मित्र रंग हिरवा व जांभळा आहे . नारंगी व हिरवा रंग हे पिवळ्या रंगाचे मित्र रंग आहे . जांभळा व नारंगी रंग हे लाल रंगाचे मित्र रंग आहे .

रंग आणि रंगसंगती कसे तयार होतात ?   [Colour and Color Scheme in Marathi ]
                                       [वरील चित्रात निळ्या रंगांची एकरंगी रंगसंगती दर्शवली आहे ]

६. एकरंगी रंगसंगती [ Monochromatic Scheme]: एकाच रंगाच्या फिकट व गडद अशा विविध छटांचा वापर करून चित्र तयार केल्यास , त्याला एकरंगी रंगसंगती म्हणतात .
७. रंगछटा [ value ] : उजळ रंगछटा [ Tint ], गडद रंगछटा [Shade] ,उजळ रंगछटा योजना [ High Key ],गडद रंगछटा [ Low Key ].
८. उष्ण व शीत रंग : रंगांमुळे जे मनात उबदारपणाचे व थंडपणाचे भाव निर्माण होतात ,त्यावरून रंगांचे उष्ण व शीत असे प्रकार पडतात .
उष्ण रंग : - लाल ,पिवळा व नारंगी हे उष्ण रंग आहे . त्यांच्या मिश्र रंगांनी उष्ण रंगसंगती तयार होते .उदा : [ सूर्यप्रकाश ,धोका ,आग ]
शीत रंग :- निळा व हिरवा हे शीत रंग आहे . त्यांच्या मिश्र रंगांनीही शीत रंग तयार होतात . उदा ;[मोरपीस ,पाणी ,आकाश व हिरवळ ]

रंग आणि रंगसंगती कसे तयार होतात ?   [Colour and Color Scheme in Marathi ]
                                             ह्या चित्रात उष्ण व शीत रंगाचा वापर केला आहे  

९. रंगांची व्हॅल्यू : रंगांना व्हॅल्यूदेखील असते . लेमन यलो व क्रिमझन रेड हे समभागांत घेतले व त्यांच्यांत समप्रमाणात पाणी मिसळून ते शेजारी शेजारी कागदावर लावले तर क्रिमझन रेड हा अधिक गडद भासतो . याचे कारण त्याची व्हॅल्यू लेमन एलोपेक्षा जास्त आहे . त्यामुळे चित्रातील रचनेमध्ये रंगाच्या स्थानाबरोबर रंगाच्या व्हॅल्यूचाही विचार करणे आवश्यक असते .

माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो  हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा . 

FAQ:

1]हिरवा रंग काय दर्शवतो?
Ans:हिरवा रंग, निसर्गाचा रंग - प्रगती, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे.


2]रंगांचा तुमच्या मूडवर कसा परिणाम होतो?
Ans:उबदार रंग (लाल, केशरी, पिवळे) ऊर्जा आणि आनंद उत्तेजित करतात तर थंड, दबलेले रंग (निळे, हिरवे, जांभळे) सुखदायक आणि शांत असतात.डायनिंग रूम किंवा किचन यांसारख्या मनोरंजनासाठी खोल्यांमध्ये उजळ, उबदार रंग सर्वोत्तम असतात, तर शयनकक्ष किंवा अगदी बाथरूमसारख्या आरामदायी जागांमध्येही थंड रंग उत्तम काम करतात.


3]रंगसंगती महत्त्वाची का आहे?
Ans:रंग अभिव्यक्तीचा मूड सेट करतो . भावना शक्तिशाली असतात आणि निर्णय घेण्यास चालना देण्याची क्षमता असते. ग्राहकांशी मजबूत भावनिक संबंध जोपासायचे आहेत आणि हे केवळ लोगोने करता येत नाही; या भावना जोपासण्यासाठी रंगांची गरज असते.


4]रंग सिद्धांत कसे कार्य करते?
Ans: कलर थिअरीमध्ये स्कीम तयार करण्यासाठी तुम्ही रंग एकत्र कसे लावता याचा समावेश होतो. उदाहरणार्थ, मोनोक्रोमॅटिक रंग योजना विविध टिंट्स आणि शेड्समध्ये एक रंग असलेली एक आहे. किंवा, समान रंगसंगतीमध्ये चाकावरील शेजारील रंगांचा समावेश असतो, जसे की लाल, नारिंगी आणि पिवळा.


5]आम्ही रंगसंगती का वापरतो?
Ans:रंगसंगती शैली आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी वापरली जातात. जे रंग एकत्र वापरले जातात तेव्हा एक सौंदर्याची भावना निर्माण करतात ते सामान्यतः रंगसंगतींमध्ये एकमेकांसोबत असतात. मूलभूत रंगसंगती दोन रंगांचा वापर करेल जे एकत्र आकर्षक दिसतील.


२ टिप्पण्या:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी. बरेच ...

Blogger द्वारे प्रायोजित.