एकाग्रतेची शक्ती वाढवता येते का ?/Can the power of concentration be increased?

एकाग्रतेची शक्ती वाढवता येते का ?/Can the power of concentration be increased? 

चित्रकला ,संगीतकला इत्यादी कलांतील श्रेष्ठ प्रतीचे यश हे एकाग्रतेचा परिणाम आहे . मनुष्याला एकाग्रतेची शक्ती वाढवण्यासाठी स्वतः मध्ये बदल अपेक्षीत असतात . पशु व मनुष्या मध्ये पशुत मनुष्या पेक्षा एकाग्रतेची शक्ती फार थोडी असते . फक्त ज्या पशूंना शिकवले त्याच पशूंना चांगल्या रीतीने लक्षात राहते . सतत त्यांना संगीतलेल्या गोष्टीन पैकी काही गोष्टी लक्षात ठेवतात . त्यांचे मन दीर्घकाल एकाग्र करता येत नाही . हाच भेद पशु व मनुष्यात आहे .काहीवेळा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात . त्याच गोष्टींवर आपले मन एकाग्र होते . बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्यात आपले मन एकाग्र होत नाही . आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्याच गोष्टीबद्दल आपले मन एकाग्र होते .
एकाग्रतेची शक्ती वाढवता येते का ?/Can the power of concentration be increased?
आवडीचे संगीत ऐकतो तेव्हा आपण त्या संगीतात रममाण होऊन जातो . संगीत हे आपल्या मनाला मोहून टाकणारे असते . ज्या विषयात आपल्याला अधिक रस असतो तो विषय आपल्या आवडीचा असतो . विद्यार्थ्याला आवडीच्या विषयात जास्त गुण मिळतात , याचा अर्थ तो त्या विषयावर प्रेम करतो ,त्याच विषयात एकाग्र होतो ,तोच विषय एक एकाग्रतेचे चांगले उदाहरण देतो .
एकाग्रतेची शक्ती वाढवता येते का ?/Can the power of concentration be increased?
उदाहरण : आई आपल्या बाळा विषयी अधिक एकाग्र असते . ते बाळ काळे असो वा गोरे ते तिच्यासाठी महत्वाचे नसते ,त्याचा चेहरा कासाही असला तरी, तिचा दृष्टीने सगळ्या जगात सुंदर हाच चेहरा आहे . ती पूर्णपणे आपल्या बाळाकडे एकाग्र झालेली असते . कारण ती त्याच्यावर प्रेम करते .
एखादे संगीत ऐकले चित्र पहिले ते पाहून आपले मन ते एकूण आपले मन स्थिर होऊन जाते . आपण आपले मन तेथून काढून घेऊ शकत नाही . मन एका गोष्टीतून दुसऱ्या विषयात पटकन एकाग्र होत नाही . ती शक्ती स्वतःला वाढवावी लागते . आपल्या आवडत्या विषयावर भाषण चालू असेल तर आपण पूर्ण एकाग्रतेणे ऐकतो . म्हणजेच आपण भाषण ऐकत असतांना स्थिर होऊन जातो ,आपले मन विविध विषयांवर एकाग्र होत असते, यावर आपलाही इलाज नाही . काही वेळा अनेक व्यक्ती आपल्या सोबत संवाद सादतात, तो विषय आपल्या आवडीचा असो अथवा नसो आपणास,परंतू ते त्या विषयात नैतिक दृष्टया अडकवून ठेवतात .
प्रश्न हा आहे ;एकाग्रता वाढविता येते का आणि आपल्याला तिच्यावर ताबा मिळवता येतो का ?
"योगी पुरुष म्हणतात , होय ,तसे करता येते !" 
त्यांच्या मते आपण मनावर पूर्ण ताबा मिळवू शकतो . ज्या विषयात मन इच्छे नुसार एकाग्र होते तेथे दुसऱ्या विषयात मन लागू शकत नाही . आपल्याला आपली एकाग्रता शक्ती ही वाढवायला हवी . आपली इच्छाशक्ती प्रकट असेल तर आपण या साठी प्रयत्नशील असायला हवे . एका विषयातून दुसऱ्या विषयात आपले मन एकाग्र करण्याची शक्ती ही मोठया प्रमाणात वाढली पाहिजे . मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करणे गेजेचे आहे .
"कारण मानवी मनाला कोणत्याही सिमा नसतात ."
जर मनुष्य स्वतः अधिक एकाग्र होईल ,तितकीच त्याची एखादया गोष्टीवर केंद्रित होण्याची शक्ती वाढेल . हेच त्याने समजून घ्यायला हवे .
एकाग्रतेची शक्ती वाढवता येते का ?/Can the power of concentration be increased?

मनाला एकाग्र करण्यासाठी तुम्ही नियमित प्राणायम करायला हवे . या अवस्थेत शरीर समतोल राहते , आणि मग मनापर्यंत पोहचण्याचा मार्ग सोपा होतो . योगासनातील काही आसन केल्याने आपल्याला त्याचा फायदाच होतो. प्राणायम हे मानवी मन एकाग्र करण्यासाठी उपयुक्त आहे ." मनाला कृत्रिम साधनांनी आवरून धरण्याचा प्रयत्न करू नये . तुम्ही प्राणायम केले तरी फायदा हा होणारच !"        

२ टिप्पण्या:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी. बरेच ...

Blogger द्वारे प्रायोजित.