विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ।All Round Development Of a Student

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ।All Round Development Of a Student

" काळा रंग हा अशुभ समजला जातो 
      पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा 
         अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो ! ''

"विद्यार्थी "

All Round Development Of a Student,holistic development of students
STUDENT
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय आहे . ध्येय हे एकदम एका टप्प्यात गाठता येणार नाही . ध्येय हे दूरगामी स्वरूपाचे असते ,तर ध्येयाप्रत जाणारी प्रत्येक पायरी म्हणजे एकेक उद्दिष्ट्य असते . 
सर्वांगीण विकासात भाषांचा योग्य वापर करता येणे ,निरीक्षण ,तर्कशुद्ध विचार करता येणे ,दुसऱ्याचे विचार व भावना समजावून घेणे ,नवनवीन कल्पना आणि विचार मांडता येणे ,दैंनदिन जीवनातील विविध व्यवहार - खरेदी-विक्री ,बँक व पोस्ट - ऑफिस यांचे व्यवहार करता येणे विविध कौशल्ये व चंगल्या सवयी आत्मसात करणे या अनेक बाबींचा विचार विद्यार्थ्यांसाठी करावा. 
प्राथमिक वर्गापासून ते दहावीपर्यंतच्या कालावधीत शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर विद्यार्थी जे काही आत्मसात करतो त्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सर्वांगीण विकास होय . या सर्वांगीण विकासातील प्रत्येक टप्पा ठराविक कालावधीत साध्य होतोच असे नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात उद्दिष्ट्ये हि महत्वाची भूमिका बजावतात .
मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हे शिक्षणाचे सर्वोच्य ध्येय होय , अन्य सर्व ध्येये त्या ध्येयापर्यंत 
पोहचण्याच्या वाटचालीतील टप्पे होय . विद्यार्थ्यांमध्ये विकास होणे गरजेचे आहे .

All Round Development of a student ,Holistic development of students
STUDENT
समाजात विशिष्ट प्रसंगी कसे वागले पाहिजे याचे शिक्षण दिले पाहिजे . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल होईल आणि इष्ट वर्तनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये "विकास होणे "म्हणजेच " शिक्षण " होय . शाळा ही महत्त्वाचे माध्यम असते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यामध्ये . सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक ,मानसिक व भावनिक विकास होतो . विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या शारीरिक व मानसिक क्षमतांना ओळखून त्यांच्या विकासाच्या दृष्टीने केलेला प्रयत्न म्हणजे सर्वांगीण विकास होय .

आई वडील आणि शिक्षक : 

All Round Development of a student,holistic development of student
आई - वडील 
आई - वडील आणि शिक्षक हे परिवर्तन घडून आणू शकणारे तीन महत्त्वाचे सामाजिक घटक आहेत . बालपणीच शिक्षण आणि नीतिमूल्य ही महाविद्यालयीन शिखरांपेक्षा खूपच महत्त्वाची असतात . कारण एकदा शिकवलं कि मुलं ते आपल्या सद्सद्विवेक बुद्धीत साठवून ठेवतात . विद्यार्थ्यांचं एक विशिष्ट लक्षण असते "प्रश्न विचारणे "त्यांना प्रश्न विचारू द्या आणि त्या प्रश्नांचे उत्तर द्या .
'' लहान मुलं आणि तरुण हे राष्ट्राच्या भविष्याचं चित्र असतात "
विद्यार्थी भावनेच्या आहारी जाणार नाही . याबद्दलची सावधानता बाळगणे जरुरी असते . कारण भावनेचा उद्रेक झाल्यावर विद्यार्थ्यांकडून विवेक भ्रष्ट होण्याची शक्यता असते . म्हणून व्यक्तिमत्व विकासामध्ये भावनिक विकासाच्या दृष्टिकोनातून भावनांना आव्हान करणारे विषय आभ्यासक्रमात दिले पाहिजे .
विद्यार्थ्यांमध्ये प्रेम ,द्या ,निष्ठा ,सहकार्य या गुणांच्या विकासाला वाव देणारे असावे . विद्यार्थ्यांच्या भावना आविष्काराला संधी दिली पाहिजे . तसेच प्रेम , द्या ,सहकार्य यांसारख्या भावनांचा विकास होण्यासाठी विशिष्ट लक्ष दिले गेले पाहिजे .
मुलं जेव्हा विद्यार्थी अवस्थेत असतात तेव्हा योग्य मार्गदर्शन द्यायला हवे . ज्या गोष्टींची माहिती नसते त्या गोष्टी समजावून सांगणे महत्वाचे ठरते . पालकांनी मुलांकडे विशिष्ट लक्ष द्यायला हवे . निसर्गाच्या सानिध्यात मुलांना न्यायला हवे .उंच ठिकाणी जसे किल्ले , डोंगर नेल्याने शारीरिक क्षमता ,आत्मविश्वास  यातून धाडस करण्याचे  मुले शिकतात . त्याचप्रमाणे निसर्ग त्यांना जवळून पाहता येते . मुलांवर योग्य व चिरकाल टिकणारे संस्कार करावेत . जेणे करून त्यांना ते भावी आयुष्यात उपयोगी पडतील .
" शिकण्याने स्वनात्मकता येते , रचनात्मक विचारांकडे विद्यार्थ्यांना नेते , विचार केल्याने ज्ञान मिळते आणि तेच ज्ञान विद्यार्थ्यांना महान बनवते !"  

पूर्वी गुरुकुल पद्धतीतील अध्ययन : 

All Round Development of a student,holistic development of student
गुरुकुल 
प्राचीन काळी मूलं  सर्वसाधारणपणे वर्षाचा झाल्यानंतर पिता त्याची विद्यार्जनासाठी तयारी करून घेत असे .
मुलांवर संस्कार करून गायत्री मंत्रांचा त्याच्याकडून जप करून घेऊन त्याची गुरुगृही रवानगी केली जात असे .
त्या वेळेस गुरुकुलातील हा काळ १२ वर्षाचा म्हणजे संपूर्ण एका तपाचा होत असे . गुरूच्या पूर्ण कसोटीत मूल पूर्ण उतरल्याशिवाय त्याचे शिक्षक पूर्ण होत  नसे .
गुरुचे आश्रम गावापासून दूर निसर्गात विशेषतः अरण्यात असत . त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक तयारीसाठी हे वातावरण पोषक असे . मुलांना घरची आठवण न यावी व ते एकाग्रतेने शिक्षण घ्यावे यासाठी गुरु हे सर्वकाळजी घेत .
आश्रमातील सर्व कष्टाची कामे विद्यार्थ्यास स्वतः करावी लागत असत . प्रातः काळी उठणे , प्रातः विधी आटोपल्यानंतर व्यायाम त्यांनतर गायीचे दूध व फलहार हा त्यांच्या शरीर तंदुरुस्तीसाठीपोषक ठरत असे . त्यानंतर अवघड विषयांचे पाठांतर ,वाचन सकाळच्या काळात असे ,त्यानंतर भोजन ,विश्रांती व दुपारून कला कौश्यल्याचे काम असत . आश्रमात शिक्षणाबरोबर अश्रमाची साफसफाई ,स्वयंपाकासाठी व  यज्ञविधीच्या सुविधा गोळा करणे . आश्रमातील गायी ,गुरुची व्यवस्था व काळजी आदी अनेक प्रकारची कामे स्वतः करावी लागत असल्याने विद्यार्थी स्वावलंबी बनून समाज उपयोगी  कार्य करण्यास सक्षम बनत असे .एकंदरीत काय तर शिक्षण हे "समाजामुख "  होते .

All Round Development of a student,holistic development of student
गुरुकुल 
आश्रमात परस्परांबद्दल स्नेह , स्वावलंबन , कर्तव्य ,शिस्त आदी कौश्यल्य अशा प्रकारच्या विविध गुणांचा विकास आश्रमात होत असे . त्यामुळे हा विद्यार्थी समाजाच्या दृष्टीने महत्वाची व्यक्ती ठरत असे .
यावरून शिक्षण प्रणाली कोणतीही असो मात्र विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे . आजची शिक्षण प्रणाली वेगळी असली तरी शाळा व घर यातून मुलं शिकत असतात . आई वडील हे परिवर्तन घडवून आणण्यास मुख्य भूमिका बजावतात .
म्हणून,
सर्वांगीण विकास हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील चरित्र ,क्षमता आणि भविष्याला आकार देतात ! "

1 टिप्पणी:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी. बरेच ...

Blogger द्वारे प्रायोजित.