भय मुक्त व्हा आणि शूर बना / Be free from fear and be brave

भय मुक्त व्हा आणि शूर बना/Be free from fear and be brave

भय मुक्त व्हा आणि शूर बना / Be free from fear and be brave

वादळात सापडलेले जहाज यांचे तुम्ही काही चित्रपट हि पहिले असाल किंवा बातम्या ही पाहत असाल . वादळातील तुफानाशी सामना करत काही जहाजे डुबताही तर काही स्वता : च्या सलामतीसाठी अनेक प्रयत्न करतात . आपण पाहतो तेव्हा आपल्याला पाहतांना त्रास होतो . ते तुफानात शूरतेने लढत असतात . तुफानात अडकलेल्या आपल्या बांधवाना वाचवण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात . मोठमोठ्याने ओरडून "धीर सोडू नका लवकर बाहेर पडा "असे म्हणून प्रोत्साहन देतात . आपणही असे धीट आणि उदार झाले पाहिजे . धैर्याने ,शौर्याने पुढे चालायला हवे .
जेव्हा जेव्हा अंधकाराचे आक्रमण होईल तेव्हा तेव्हा आपले सत्य स्वरूप प्रकट करा म्हणजे सर्व विरोधी शक्तीचा नाश होईल . पर्वता प्रमाणे संकट जरी आले असले तरी सर्वकाही भयानक आणि अंधकारमय जरी भासत असले तरी हि सर्व माया आहे . भिऊ नका , ती माया नाहीशी होऊन जाईल ,ती विचार सरणी चिरडून टाका म्हणजे ती लुप्त होईल . कितीही संकटे आली तरी याचा विचार करू नका . पुढे होऊन ,स्वतःचे स्वरूप प्रकट करण्याची हीच वेळ आहे ,पुनः पुनः प्रयत्न करत प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत राहणारा उद्देश डोळ्यासमोर ठेवा . स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकाल. कारण तुम्ही स्वतःचे मित्र व शत्रू आहेत . त्यामुळे उठून उभे राहण्यासाठी स्वतःचे मित्र बना तरच आणि तरच धैर्य ,शौर्य तुमच्या ठाई स्थिर होईल .

भय मुक्त व्हा आणि शूर बना / Be free from fear and be brave

एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी आशा बाळगू नका. स्थिर आणि शांत राहाल तर सर्वोच्च ध्येयाला प्राप्त कराल . मत्सर व स्वार्थीपणा सोडून दया या दोन्ही गोष्टी टाळा . आज्ञाधारक बना आणि सत्य ,मानवता ,स्वदेश ह्यांच्या विषयी सर्वदा प्रामाणिक रहा . लक्षात ठेवा तुम्ही अवघे जग हलवून सोडाल . स्वतःचे व्यक्तिमत्त्व ,स्वतःचे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे ,दुसरे तिसरे काही नाही .
मत्सर हा गुलामांना मिळालेला शाप आहे . तुम्हाला मत्सर टाळावा लागेल ,तरच आणि तरच तुम्हाला यश हे लाभेल .
माणूस व्हा !
जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा सगळे आनंदित होते ,हसत होते ,तुम्ही मात्र रडत होतास . असे काही करून जावे जीवनात कि तुम्ही जाल तेव्हा सगळे तुमच्यासाठी रडतील आणि तुम्ही हसत हसत मराल. जीवनात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शूरता हि दाखवावी लागते .
एरवी कोण काय म्हणेल ,अमक्याने काय म्हटले ,ह्या भानगडींनीच रात्रंदिवस डोके तापविले तर, जगात कोणतेच थोर कार्य करता येणार नाही . लोक तुमची निंदा करो व स्तुती करोत , जे व्हायचे असेल ते होवो ,पण तुम्ही तुमचे इष्ट साध्य करा . "शूर बना ! भय मुक्त व्हा !"
व्यभिचार , अधर्म , नरक , मृत्यू हेच जे जे अकरणात्मक विचार आहेत . ते सारे भयरूपी सैतानापासूनच निर्माण झाले आहेत . व्यक्तीला सुख दुःखाच्या , आपत्तीविपत्तीच्या लाटांचे सतत तडाखे सोसावे लागतात, पण लक्षात ठेवा या साऱ्या गोष्टी केवळ क्षणभरच टिकतात . त्यांच्याकडे लक्ष देवू नका .
"आत्मविश्वास वाढवा. तुमचे भविष्य हे तुमच्याच हातात आहे . हे विसरू नका . शूर बना ! पुढे चला !"
  
भय मुक्त व्हा आणि शूर बना / Be free from fear and be brave
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ग्रीन टी फायदेशीर/Green tea benefits for those who drink milk tea जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी. बरेच ...

Blogger द्वारे प्रायोजित.